महाराष्ट्र
दीपाली सय्यद यांनी रचला होता राज ठाकरेंच्या हत्येचा कट

अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टमधून होणारे सर्व व्यवहार बेकायदेशीर असून त्यांच्याकडे येणारा पैसा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. तसेच दीपाली यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
दीपाली यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. ज्यात ५० लोकांना ५० हजारांचे चेक देण्यात आले, जे चेक बनावट असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.
त्यामुळे दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ७०० ते ८०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. हा सर्व पैसा आला कोठून, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नाही तर राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास दीपाली यांचे दाऊदसोबतच्या संबंधांचे सर्व पुरावे आपण सरकारला आणि माध्यमांना देऊ, असे शिंदे म्हणाले.