क्राईम

गर्लफ्रेंडला अश्लील मेसेज, दर्शनने फॅनला संपवले

  1. कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा आणि त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री पवित्रा गौडा यांना सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश पाठविणाऱ्या चाहत्याची जून महिन्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. या हत्या प्रकरणात आता बंगळुरू पोलिसांनी 3,991 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. ज्यामध्ये मृत चाहता रेणुकास्वामीने अभिनेत्री पवित्राला कोणते मेसेज पाठवले आहे, याची माहिती देण्यात आली आहे.
    रेणुकास्वामीने पवित्राला त्याच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची ऑफर दिली होती. यासाठी तो तिला दरमहा दहा हजार रुपये देण्यास तयार झाला होता. तसेच मृत चाहता रेणुकास्वामी पवित्राला अश्लील मेसेजेस आणि गुप्तांगाचे फोटोही पाठवत असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
    रेणुकास्वामीचे असे अश्लील मेसेज सहन न झाल्यामुळे पवित्राने दर्शनला रेणुकास्वामीच्या मेसेजला पाहून घेण्यास सांगितले होते. रेणुकास्वामीला जाळ्यात अडकविण्यासाठी दर्शनने पवित्राच्या नावे त्या चाहत्यासोबत मेसेज करायला सुरुवात केली. त्यानंतर रेणुकास्वामीशी चॅटिंगमधून जवळीक वाढवत तो कुठे राहतो, काय करतो या सा-या गोष्टींची माहिती दर्शनने काढली.
    ज्या शेडमध्ये रेणुकास्वामीला आणले गेले आणि तिथे त्याचा खून झाला, त्या शेडचा वॉचमन या खटल्यातील प्रमुख साक्षीदार आहे. त्यानेच अभिनेता दर्शन आणि पवित्राला तिथे येताना पाहिले होते. तसेच शेडमधील दोन मजुरांनी रेणुकास्वामीचा छळ प्रत्यक्ष पाहिला होता.
    दरम्यान अभिनेता दर्शन, अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यासह एकूण 17 जण या गुन्ह्यात आरोपी आहेत. रेणुकास्वामी याचा खून होण्यापूर्वी घेतलेला एक फोटो सध्या समोर आला आहे.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa