सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात सशस्त्र दरोड्याच्या भयंकर डाव

सोलापूर : शहरातील हत्तुरे वस्ती ते पत्रकार भवन दरम्यान अंतराज्य सशस्त्र दरोड्याच्या तयारीतील सहा जणांच्या टोळीला विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद केले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन लहान मोठे कटर, केसरी कुऱ्हाड, हाड, निळा एक्साबलेड, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, इलेक्ट्रिक कटर मशीन, लोखंडी हातोडी, काळे सहा कापडी मास्क व पांढरी एर्तिका (एम एच.12 टीडी 2238) असा एकूण 13 लाख तीन हजार 800 रुपये किमतीचे साहित्य मिळाले.
या प्रकरणी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल कृष्णप्पा बंडीवडार रा. हनगल, जि. हवेली, राज्य कर्नाटक) अनिल शिवप्पा वड्डर, प्रशांत उर्फ परश्या, कृष्णा उर्फ कृष्णाप्पा बंडीवडार, प्रवीण आणि अनंत (रा.चिनहळ्ळी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई ३ ऑक्टोबर रोजी आठ वाजून वीस मिनिटांनी करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.