क्राईम
ब्रेकिंग! ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील ‘ते’ CCTV फुटेज बाहेर काढा

- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना आमदार उत्तम जानकर यांची जीभ घसरली होती. त्यांनी मुंडेंचा उल्लेख पुरुष वेश्या असा केला होता. त्यानंतर आताही जानकरांनी मुंडेंवर निशाणा साधला. मुंडेंचे ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल, असे जानकर म्हणाले.
- देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, बीड जिल्ह्यात अराजकता निर्माण झाली आहे. गुंडगिरी वाढली आहे. अराजकता निर्माण करणाऱ्यांना राजकीय वरदहस्त लाभल्याशिवाय गुंड तयार होत नाही. राजकारणी जाणीवपूर्वक गुंडाना पोसतात आणि लोकांमध्ये भीती निर्माण करतात. वाल्या कोळ्यांने कुणासाठी रांजन भरले, हे राज्याला माहित आहे. त्यामुळे गुंडांना पोसणाऱ्यांचाही बंदोबस्त झाला पाहिजे, असे जानकर म्हणाले.



