महाराष्ट्र
शरद पवार ‘जाणता राजा’? म्हणायला लाज नाही वाटत? ते कुठल्या लढाईला गेले होते?

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना ‘जाणता राजा’ ही पदवी दिली जाते. त्यांचा वेळोवेळी जाणता राजा म्हणून उल्लेख केला जातो. मात्र, ते कुठल्या लढाईला गेले होते? असा खोचक सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनीही नेत्यांना पदवी देताना शब्दांचा योग्य वापर करावा, असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अवमानकारक भाष्य करणे अयोग्य आहे. शिवछत्रपती हे देशाचे आराध्य दैवत असून, कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पाटील म्हणाले, समन्वय कमी असल्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात काही प्रमाणात व्याज परताव्यात अडचणी येत होत्या.
मात्र, आता व्याज परताव्याची प्रकरणे निकालात काढून ती शून्य टक्यांवर आणली जाणार आहेत. २०१८ पासून महामंडळाची जबाबदारी माझ्याकडे आली असून, या कालावधित तीन हजार ५०० कोटींचे कर्जवाटप व ५० हजार लाभार्थी जोडले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन हजार २०० लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतील बहुतांश लाभार्थी परतावा करत असल्याने विविध बँका स्वागत करत आहेत.