राजकीय

ब्रेकिंग! होय, भाजपसोबत बैठक झाली होती

  1. अलीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दावा केला होता की, विधानसभा निवडणूक 2019 नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी बैठक झाली होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, अमित शहा यांच्यासह दोन्ही पक्षातील बडे नेते या बैठकीत सामील झाले होते. अजितदादा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता पवार यांनीदेखील अशी बैठक झाल्याचे मान्य केले आहे.
  2. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादा सातत्याने आरोप करत आहेत की, शरद पवारांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत चर्चा करण्यास पुढे केले. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला आणि ऐनवेळी माघार घेतली. मात्र याबाबत शरद पवारांनी कधीही स्पष्टपणे काही गोष्टी बोलून दाखवल्या नव्हत्या. मात्र पहिल्यांदाच पवारांनी सत्तास्थापनेबाबत अमित शहा आणि भाजप नेत्यांसोबत बैठक झाल्याचे मान्य केले आहे.
  3. पवार यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी दिल्लीत ही बैठक झाली होती. पक्षातील अनेक नेत्यांवर ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईची टांगती तलवार होती. त्यामुळे या नेत्यांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. मात्र भाजपसोबत जाण्यास माझा विरोध होता. पक्षातील नेत्यांकडून सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन मी बैठकीला होकार दिला.
  4. भाजप नेत्यांशी बोलून एकदा जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा देखील उपस्थित होते. सत्तास्थापनेबाबत भाजपसोबत बैठक झाली होती. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव भाजपसोबत गेल्यास कमी होईल, असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे होते. भाजपच्या नेत्यांकडूनच याबाबत ऐकून घ्यावे, असे पक्षातील नेत्यांनी सांगितले. त्यामुळे दिल्लीत भाजप नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती, असे शरद पवार यांनी सांगितले.  

Related Articles

Back to top button