क्राईम
ब्रेकिंग! खंडणी प्रकरणाचा गेम फिरला?

- पुण्यातील जनआक्रोश मोर्चात काल भाजपा आमदार सुरेश धस यांनी आरोप केलेल्या नितीन बिक्कड यांनी अखेर मौन सोडले. धस यांनी केलेले सगळेच आरोप बिक्कड यांनी फेटाळून लावले आहेत. धस यांच्यासोबत दिसलेला गँगस्टर घायवळ यानेच मला गावातील घरी येऊन धमकी दिली असल्याचे असल्याचे सांगितले. धस यांच्या समोर आलेल्या फोटोनंतर आता बीडमधील खंडणीच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. पुण्यातील गँगस्टर हे बीड, धाराशिवमधील पवनचक्की माफिया असल्याचा आरोप केला आहे.
- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चांगलेच तापले आहे. पुण्यातील जन आक्रोश मोर्चात बोलताना धस यांनी बिक्कड यांच्यावर डील करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर आता बिक्कड यांनी धसांचे आरोप फेटाळून लावले.
- धस आणि गँगस्टर घायवळ यांचे संबंध काय आहेत, हे सगळ्या बीड आणि धाराशिवला माहित असल्याचा दावा बिक्कड यांनी केला. पवनचक्की माफिया कोण आहे, हे बीड आणि धाराशिवमध्ये विचारले की तुम्हाला याचे उत्तर मिळेल. कोण खंडणी घेते, कोण मारहाण करते, हे सगळे लोकांना माहित आहे.
- पवनचक्की खंडणीच्या प्रकरणात धस हे इतरांवर आरोप करतात. या प्रकरणात स्वत: असताना इतरांना काय म्हणता? पाटोदा तालुक्यात पवनचक्कीत कोणी किती खंडणी घेतली, हे स्थानिकांनाही माहित असल्याचे सूचक वक्तव्य बिक्कड यांनी केले.
- मी खंडणीची डीलिंग करत असतो तर मला दोन-दोन कंपन्यांनी कंत्राटे दिली नसती. या उलट मलाच घायवळ गँगकडून धमकी देण्यात आली आहे. घायवळ हा माझ्या गावात येऊन माझ्या वडिलांना धमकी देऊन गेला असल्याचे बिक्कड यांनी सांगितले.