क्राईम

ब्रेकिंग! अपहरण, अत्याचार, मग खून

  • एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमधील या प्रकरणात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा आणि नंतर तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीचा एन्काऊंटर करा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून केली जात असताना विशालने आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास तळोजा तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
  • डिसेंबर महिन्याच्या 23 तारखेला विशालने एका चिमुरडीचे अपहण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत हत्या केली होती. बदलापूर प्रकरण ताजे असताना हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. यादरम्यान अधिक चौकशी केली असता यापूर्वीही विशालने अनेक चिमुकलींना शिकार बनवल्याचे समोर आले होते.
  • अनेक वर्षापासून विशालकडून अल्पवयीन मुली, मुलांवर लैंगिक अत्याचार सुरु असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्यावर अनेक गुन्हाची प्रकरणंही नोंदवलेली आहेत. त्यामुळे अशा नराधमाला कडक शिक्षा करण्याची मागणी राज्यभरातून केली जात होती. 

Related Articles

Back to top button