महाराष्ट्र

ब्रेकिंग! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहेत. तर तातडीने मुख्यमंत्री विधानभवनाकडे निघाले होते. दरम्यान आता हाती आलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. याविषयीची घोषणा ते विधानभवनात करतील.

9 डिसेंबर 2024 रोजी देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्यासुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आज सकाळपासूनच मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता. तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

Related Articles

Back to top button