क्राईम

स्वारगेट अत्याचार प्रकरणात पुन्हा ट्विस्ट

  • पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील अत्याचार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
  • या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाने धक्कादायक दावा केला आहे. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे, असा दावा वकील सुमीत पोटे यांनी केला आहे. घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये साडेसात हजारांचा पैशांचा व्यवहार झाला, असेही पोटे यांनी सांगितले. मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. 
  • आम्ही कोर्टाच्या परवानगीने आरोपीशी चर्चा केली. आरोपीने आम्हाला जी माहिती दिली आहे, त्यानुसार आरोपी आणि त्या तरुणीशी ३१ दिवसांपासून ओळख आहे. जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिले, तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे. तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही. तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो. त्यानंतर ती येते. त्यानंतर अवघ्या ५० मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही. त्यानंतर ती स्वत:च्या गावाकडे गेली.
  • यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली, असे पोटे यांनी सांगितले.
  • त्या तरुणीला मी साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात दिले आहेत. त्यावरुन त्यांचे वाद झाले. यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही. त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो, असे सांगितले. तर तिने ऑनलाईन नको रोख हवे, असे सांगितले. त्यामुळे त्याने रोख पैसे दिले. माझं आणि आरोपीचे युक्तीवादानंतर बोलणे झाले. त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेले नाही, अशीही माहिती पोटे यांनी दिली.

Related Articles

Back to top button