महाराष्ट्र

ब्रेकिंग! फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठले

  • नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपाने पुण्यात ठाकरे गटाला तगडा झटका दिला आहे. ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी शिवबंधन सोडत कमळ हाती घेतले आहे. आधीच ताकद कमी असलेल्या पुणे शहरात ठाकरे गटाची ताकद आणखी कमी झाली आहे. या धक्क्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठे आव्हान असणार आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, संगीता ठोसर आणि पल्लवी जावळे या माजी नगरसेवकांनी आज चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपात पक्ष प्रवेश करत असताना माजी नगरसेवक धनवडे यांनी पक्ष नेतृत्वासह स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
  • तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची आधीच पुण्यात ताकद असताना आणखी ताकद वाढली आहे. पुणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत, याचाच हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या पाच माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे भाजपाला महापालिका निवडणुकीत फायदा होणार की फटका बसणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Articles

Back to top button