महाराष्ट्र
ब्रेकिंग! विरोधकांच्या डोक्यात कबर आणि कामरा

- विरोधकांच्या डोक्यात कबर आणि कामराच आहे. आमच्यासाठी कबर आणि कामरापेक्षा महाराष्ट्रातील 13 कोटी जनता महत्त्वाची आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या हिताचे निर्णय घेतले. आम्ही सभागृहात माथाडी सुधारणा विधेयक आणले. शेतकरी, कामगार यांच्यावर चर्चा झाली. जिथे दिवसाला सहा तास काम व्हायला पाहिजे, तिथे रोज नऊ तास काम झाले. सत्ताधारी पक्षाकडे मोठे बहुमत असतानाही कोणतेही चर्चा आम्ही टाळली नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र
- फडणवीस म्हणाले. आमचे सरकार हे काम करणारे आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
- अधिवेशनात १२ कायदे मंजूर झाले. माथाडी कामगार कायद्यात सुधारणा करण्यात आली. बनावट माथाडी कामगार यामुळे ओळखता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आले आहे. सर्व प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली. फक्त एकच दिवस सभागृहात पोहचण्यास मंत्र्यांना उशिर झाला त्यामुळे 20 मिनिटांचा वेळ वाया गेला, असेही फडणवीस म्हणाले.
- धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांना सहआरोपी करणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले आम्ही नरम किंवा गरम नाही तर कायद्याने काम करणारे आहोत. कायद्याने जे करायचे होते ते केले आहे, असे ते म्हणाले.



