मोठी बातमी! महिलांची संक्रांत गोड होणार
अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला. महायुतीच्या या विषयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला. सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले.
आता राज्याचे हिवाळी अधिवेशन संपले आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबरचे पैसे हे थेट नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. तसेच महिलांना यापुढे दीड हजार रुपये मिळणार की 2100 रुपये, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी योजनेच्या रक्कममध्ये वाढ केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
महायुती सरकार पुन्हा आले तर महिलांना दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ, असे महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. अशात राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाले आहे. त्यामुळे महायुती सरकार दिलेला शब्द पाळणार का?, त्याकडे सर्वांच्या नजरा असतील.