महाराष्ट्र
बिग ब्रेकिंग! अखेर खातेवाटप जाहीर
- मंत्रिमंडळ विस्तार तर झाला पण राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होणार, याची वाट सारेच बघत होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री उशीरा किंवा उद्या सकाळी खातेवाटप जाहीर होऊ शकते, अशी माहिती अधिवेशनानंतरच्या पत्रकार परिषदेत दिली होती.
- महायुती सरकारचे खातेवाटप अंतिम झाल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले होते. त्याप्रमाणेच अपेक्षेप्रमाणे आज रात्री 9 च्या सुमारास महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर झाले.
- अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय आणि विधी, सामान्य प्रशासन, तसेच खातेवाटप न झालेली सर्वच खाती फडणवीस यांच्याकडे आहेत. तर, नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही खाती देखील एकनाथ शिंदे यांना मिळाली आहेत. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्थमंत्रालय कायम राखण्यात यश आले असून राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी देखील अजितदादा यांच्याकडेच आहे.
- खाते वाटप –
- देवेंद्र फडणवीस – गृह
- अजित पवार – अर्थ
- एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
- चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
- हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण
- चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण
- गणेश नाईक – वन मंत्री
- राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा
- पंकजा मुंडे – पर्यावरण
- उदय सामंत – उद्योग
- गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
- दादा भुसे – शालेय शिक्षण
- धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
- मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास
- जयकुमार रावल – मार्केटिंग, प्रोटोकॉल
- अतुल सावे – ओबीसी
- अशोक उईके – आदिवासी
- आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
- दत्तात्रय भरणे – क्रीडा
- आदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण