महाराष्ट्र
ब्रेकिंग! लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार?
सध्या नागपुरात हिवाळी अधिवेश सुरू आहे. यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती दिली. तसेच त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आम्ही जी आश्वासने दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
आमची एकही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत.