महाराष्ट्र

आता दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

  • सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राम सातपुते सारखा सर्वसाधारण कार्यकर्ता पाच वर्ष राबतो आणि एकट्या मारकडवाडीसाठी 22 कोटी रूपयाची काम करतो. त्याला जास्त मतदान मिळाल्यानंतर लोकांना जाऊन धमकावता तुम्ही. एखाद्या गावामध्ये मते मिळाली नाहीत, म्हणून गावामध्ये जाऊन दादागिरी करायची. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांना दिला आहे.
  • विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मारकडवाडीत बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाला. पण प्रशासनाच्या दबावानंतर ते शक्य होऊ शकले नाही. या प्रकरणी अनेक गावकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर मारकडवाडीची राज्यभरात चर्चा रंगली होती. याच मारकडवाडीच्या घटनेवर आज फडणवीस हे विधानसभेत बोलले.
  • राम सातपुते सारखा सर्वसाधारण कार्यकर्ता पाच वर्ष राबतो आणि एकट्या मारकडवाडीसाठी 22 कोटी रूपयाची काम करतो. त्याला जास्त मतदान मिळाल्यानंतर लोकांना जाऊन धमकावता तुम्ही. या धमकीचे ऑडिओ रेकॉर्डींग आहेत. आपल्याला बॅलेटच व्होटींग घ्यायचे आहे. या वोटींगमध्ये मते हे राष्ट्रवादी काँग्रस शरद पवार पक्षाला, ही कुठली पद्धत आहे? ही कुठली लोकशाही आहे? असा सवाल करत फडणवीसांनी एखाद्या गावामध्ये मते मिळाली नाहीत म्हणून गावामध्ये जाऊन दादागिरी करायची. ही दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी मोहिते पाटलांना दिला आहे.

Related Articles

Back to top button