महाराष्ट्र
ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंना तगडा झटका
- लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने मजबूत कामगिरी केली होती. पण विधानसभेला ठाकरे गटासह महाविकास आघाडी पूर्णपणे बॅकफूटला आली. ठाकरेंचे अवघे वीस आमदार निवडून आले. विधानसभेतल्या या धक्क्यानंतर आता ठाकरेंना आणखी एक तगडा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेली मुंबई उत्तर पश्चिमची जागा पुन्हा आपल्याकडे घेण्याचा ठाकरेंचा प्रयत्न फसला आहे. याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
- सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर ठाकरे आणि शिंदे गटात चुरस बघायला मिळाली होती. या चुरशीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी पराभवाचा धक्का दिला. वायकरांनी अवघ्या ४८ मतांनी ही निवडणूक जिंकली होती. पण या निवडणूक निकालावर किर्तीकर यांनी आक्षेप घेतला होता.
- मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच वायकर यांची खासदारकी रद्द करण्याबाबतची याचिकाही त्यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. आता यावर हायकोर्टाने निकाल दिला असून कोर्टाने किर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. कोर्टाच्या निर्णयामुळे डेंजर झोनमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे.