महाराष्ट्र
शपथविधीच्या तोंडावर शिंदेंना धक्का
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नागपूर शहरात होत आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ज्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, त्यांना फोन करून बोलावून घेण्यात आले आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात एकूण 39 जणांचा शपथविधी होणार आहे. या घडामोडी घडत असतानाच शिंदेंना धक्का देणारी घडामोड घडली आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयकपदाचा राजीनामा दिला आहे.