अजितदादांनी आणला नवा फॉर्म्यूला
राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत आज शपथ घेणारे मंत्र्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल, असे विधान केले आहे.
अजितदादा म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात महायुतीचे पुन्हा एकदा सरकार स्थापन झाले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 17 जागा मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 237 आमदार निवडणून आले, असे देखील अजितदादा म्हणाले. तर आज होणाऱ्या मंत्रिमंडळाबाबात देखील अजितदादा यांनी विधान केले आहे.
अजितदादा पुढे म्हणाले की, आज शपथ घेणारे मंत्री यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. प्रत्येक आमदारांना वाटतो त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी मात्र जागा मर्यादित असतात. मागच्या वेळी जेव्हा आपण सरकारमध्ये गेलो तेव्हा आपल्याला अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता. मात्र आता पुढील पाच वर्षांसाठी आम्ही तिघांनी असे ठरवले आहे की, अडीच- अडीच वर्षांसाठी आमदारांना संधी द्याची. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना प्रतिनिधी मिळेल, असे देखील अजितदादा म्हणाले.