महाराष्ट्र
ब्रेकिंग! मंत्रिमंडळात पॉवरफुल शिलेदारांचा पत्ता कट?
मंत्रीमंडळाचा विस्तार आज होत आहे. या विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची चर्चा सुरू होती. त्यात सर्वांचे लक्ष लागले होते ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे. शिंदे मंत्री म्हणून कोणाला संधी देणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. शिवसेनेच्या पदरात 11 मंत्रिपदे पडली आहेत. मात्र यात गेल्या मंत्रिमंडळातील 3 मंत्र्यांचा मात्र पत्ता कट करण्यात आला आहे. त्यात तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. हे मंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जात होते.
तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या तिन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी भाजपाचाच विरोध होता.
मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचे नाव अजूनही आले नाही. त्यामुळे या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.