पुण्याच्या आयटी कंपनीतील तरुणीचा खून

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच पुण्यातून तरुणीच्या हत्येची एक खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीच्या तरुणीवर कंपनीमधील सहकाऱ्यानेच जीवघेणा हल्ला केला. या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पुण्यात येरवडा भागात असणाऱ्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुभदा कोदारे असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये अकांऊटंट म्हणून ही तरुणी कार्यरत होती.
काल सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये तिच्याच सहकाऱ्याने तिच्या हाताच्या कोपऱ्यावर धारधार शास्त्राने वार केले. या हल्ल्यात शुभदा ही तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा कनोजा याला अटक केली आहे.



