सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! इंस्टाग्रामवरून ओळख झाली ; पुढे तरुणीवर अत्याचार
- सोलापूर (प्रतिनिधी) इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणीस तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तिच्याच घरी व लॉजवर नेऊन तिच्या इच्छा विरोधात जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
- या घटनेची हकीकत अशी की, नोव्हेंबर २०२३ साली लातूर येथे राहणाऱ्या जयेश वाघ या युवकाची इंस्टाग्रामवर सोलापुरातील तरुणीशी ओळख झाली. या ओळखीतून दोघात जवळीकता वाढली. त्यानंतर त्या तरुणाने तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तरुणीच्या घरीच तसेच बार्शी रोडवरील एका लॉजवर नेऊन वर्षभर शारीरिक संबंध ठेवले. तसेच दोघांचे अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. याबद्दल त्या पीडित तरुणीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत.