महाराष्ट्र
बड्या उद्योगपतीच्या घरी शरद पवार-भाजपच्या वरिष्ठ नेत्याची बैठक
- सध्या राजकारणात पडद्याआडून महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि अर्थनीतीमुळे लोकप्रिय असलेले उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याची भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला भाजपाविरोधात सशक्तपणे लढणाऱ्या महाविकास आघाडीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- पवार यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिग्गज नेत्यांनी ६ जनपथ निवासस्थानी गर्दी केली होती. वाढदिवसाच्या निमित्ताने भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतानाच गुरुवारी रात्री अदानी यांच्या घरी भाजपाच्या केंद्रीय नेत्याने पवार यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.
- उभय नेत्यांच्या भेटीत मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकांत शरद पवार गटाची भूमिका काय असेल, याबाबत चर्चा केली तसेच आगामी काळातील पक्षाच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. सत्तावाटपात योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही भाजप नेत्याने शरद पवार गटाला दिली.
- परंतु सत्तेत सामील होण्यावरून शरद पवार गटात सध्या दोन मतप्रवाह आहेत. आपण भाजपा सोबत सत्तेत जायला हवे, असे एका गटाला वाटते तर सत्तेत सहभागी न होता, सत्तेबाहेर राहून संघर्ष करून लोकांची मने जिंकू. सत्ता आपल्यापासून फार लांब नसेल, असे पक्षातील दुसऱ्या गटाला वाटत असल्याचे समजते.