महाराष्ट्र
ब्रेकिंग! मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी
![](https://solapurviralnews2.com/wp-content/uploads/2024/12/IMG_20241205_58744-780x470.jpg)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. उद्या दुपारी बारा वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या पंधरा ते वीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
- उद्या पंधरा ते वीस मंत्र्यांचाच शपथविधी होणार आहे. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक आठ ते दहा मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षाचे पाच-पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदे आणि अजितदादा यांच्या पक्षाकडे कोण कोणती खाती जाणार? याची चर्चा सुरू आहे.
- अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या चार ते पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे, अदिती तटकरे, छगन भुजबळ, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. पुढच्या टप्प्यात अनिल पाटील, दत्ता भरणे, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
- शिवसेनेकडून पाच ते सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे अडीच अडीच वर्षे मंत्रिपदे फिरती राहण्याची शक्यता आहे.