सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूरकर कधी सुधारणार? रक्कम दुप्पट होणार म्हणून गुंतवणूक केली
- सोलापूर (प्रतिनिधी) बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा व रक्कम दुप्पट होणार असल्याबाबत व्हिडिओ पाठवून फसवणूक केल्याप्रकरणी एका जनाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.८ नोव्हेंबर २०२२ ते १४ मार्च २०२४ रोजी फिर्यादी यांच्या घरी घडली.याप्रकरणी प्रवीणकुमार सुरेश अकिम (वय-३४,रा.एफ ग्रुप,विडी घरकुल) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून विवेक बालकृष्ण मिश्रा (रा. माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे विवेक गोल्डन या यूट्यूब वरील वरील संशयित आरोपीचे व्हिडिओ पाहत असताना विवेक मिश्रा याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून फोनवरती बोलणे केले. त्यानंतर वरील संशयित आरोपी याने फिर्यादीस वेळोवेळी फोन करून विविध बिटकॉइन बाबत गुंतवणूक केल्यास जादा परतावा व रक्कम दाम दुप्पट होणार असल्याबाबत फिर्यादीत व्हिडिओ पाठवू लागला. त्यानंतर फिर्यादी यांनी व्हिडिओ पाहून त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी गुगल पे,फोन पे वरील रक्कम गुंतवली.
- त्यावेळी विवेक मिश्रा याने फिर्यादीस दुप्पट परतावा देतो असे खोटे सांगून फिर्यादी यांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर वापर करून फिर्यादी यांना अद्याप रक्कम पाठवली नाही व कोणताच परतावा दिला नाही. तसेच विवेक मिश्रा याचा दुसरा मोबाईल क्रमांक मिळवून त्याला संपर्क केला असता, तो फिर्यादीस ओळखत नाही, कसले पैसे, हमारेसे पंगा मत लो, नही तो तेरा मोबाईल हॅक करके तेरा व्हिडिओ बनाके बदनामी करेंगे और तुझे कही मुंह दिखाने जगा नही रहेंगी. पोलीस भी तेरे पीचे पडेगी. अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करीत आहे.