महाराष्ट्र

दोन अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ?

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधी आघाडी इंडिया ब्लॉकने निवडणूक आयोग आणि भाजपवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मुस्लिमांना दोन अपत्यांपेक्षा अधिक असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याचा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. बांग्लादेशात होत असलेल्या हिंदु समाजावरील अत्याचाराच्या विरोधात काल महाराष्ट्रात हिंदु समाजाकडून न्याय यात्रा काढण्यात आली. सिंधुदूर्गमध्येही हिंदू समाजाकडून बांग्लादेशातील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यात आला. या मोर्चादरम्यान राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
  • मुस्लिमांना दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळा. कारण मतदान करताना यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हिंदुत्ववादी सरकार नको आहे, पण अन्य वेळी प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुस्लिम कुटुंब असतात. तुम्हाला जर तुमचा धर्मच महत्वाचा असेल तर लाभ का घेता? लाडकी बहीण योजनेत सर्वाधिक मुस्लिमच दिसतात. माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की, आदिवासी समाज वगळून मुस्लिम समाजात दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तर त्यांना या योजनेतून वगळावे, जे लोक सरकारला मतदान करतात, मोदींवर विश्वास ठेवतात त्यांना आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे, असे राणे म्हणाले.
  • दरम्यान या मागणीबाबत पक्षातील आणि महायुतीचे नेते यावर योग्य तो निर्णय घेतील, असे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button