महाराष्ट्र

बिग ब्रेकिंग! 2019 पेक्षा मोठा राजकीय भूकंप होणार?

  • राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. त्यानंतर आता भाजपा महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे मिशन कमळ असणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.
  • महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपाच्या वरिष्ठ लोकांनी हा दावा केला आहे. लवकरच हे खासदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांमध्ये अस्वस्थता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
  • यामुळे राज्यात पुढच्या काळात भाजपचे ऑपरेशन कमळ असेल, अशी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेमके कोणते खासदार भाजपाच्या संपर्कात आहेत, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाली होती, त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपाकडून हा नवा डाव टाकण्यात येत आहे.
  • विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाच्या बड्या नेत्याने केला आहे. 2019 पेक्षा मोठा राजकीय भूकंप राज्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Back to top button