बिग ब्रेकिंग! सोलापूर शहरात खळबळजनक प्रकार

सोलापूर शहरातील रुपाभवानी मंदिर जवळील विद्युत कार्यालय शेजारील नाल्याच्या कोपर्यात बेवारस मृत पुरुष जातीचे अर्भक आढळले. या नवजात अर्भकाच्या पोटाच्या खालील भागाचे कुत्र्यांनी लचके तोडले. आज दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, रुपाभवानी परिसरात बांधकाम काम करणार्या व्यक्तीला नाल्यात अर्भकाचे लचके कुत्रे तोडताना दिसून आले. ही माहिती बांधकाम कामगाराने येथील नागरिकांना सांगितली. माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती नागरिकांनी जोडभावी पेठ पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी नवजात अर्भकाला जखमी व बेशुद्ध अवस्थतेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याने डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
पोलिसांकडून त्या परिसरातील सीसीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे.यामध्ये अर्भक कोणी आणून टाकले. याचा तपास आता पोलिस युद्ध पातळीवर करीत आहेत. आज अर्भकाचे शवविच्छेदन होणार असून त्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पैकेकरी हे करीत आहेत.