शंभर शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला…

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडी गावात आज महायुतीच्या नेत्यांची सभा पार पडली आहे. या सभेदरम्यान जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार टीका केली आहे.
राज्यात धनगर समाज लोकशाही विरोधात वातावरण तयार केले. कारण शंभर शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. मात्र यावेळी मारकडवाडी मतदारसंघात शंभर गावे आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले, असे आमदार पडळकर म्हणाले.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येत आहेत. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे देखील गावभर फिरून येत आहेत. तसेच मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली असल्याचे पडळकर म्हणाले.