क्राईम

गर्लंफ्रेडला भेटायला जाताच गल्लीतील तरुणांनी केला विरोध

  • एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी त्या भागातील काही तरुणांनी विरोध केल्यामुळे तरुणाने बॉम्बस्फोट करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे.
  • त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून 12 देशी बनावटीचे बॉम्बही जप्त केले. अधिक माहिती अशी की, अनादन हा कटरा येथील एका तरुणीशी मोबाईलवर बोलत होता. तिला भेटायला जात होता. मात्र कटरा येथील अनेक तरुणांची नजर त्याच्यावर होती. कटरा येथील तरुणांनी अनादनला तेथे येण्यास विरोध केला. 
  • त्याला मुलीचा नाद सोडण्यास सांगितले. यानंतर त्याने घडलेली घटना मित्रांना सांगितली. त्यानंतर तिन्ही मित्रांनी कटरा येथील त्या भागात बॉम्बस्फोट करायचा ठरवले. यानंतर रात्री तिघेही मित्र कटरा येथील मारहाण झालेल्या भागात गेले. अनादन गाडीवरून खाली उतरला आणि तेथे त्याने तीन बॉम्ब फेकल्यानंतर तो मित्रांसोबत पळून गेला.
  • या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर कर्नलगंज पोलीस आणि एसओजीने तपास सुरू केला. चौकशी केली असता एक दिवसापूर्वी तरुणांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू करून तिघांना अटक केली आहे.

Related Articles

Back to top button