राजकीय
ब्रेकिंग! शरद पवारांनी मान्य केला पराभव

- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी काल दिवसभर भूमिका मांडली नाही. त्यामुळे पवार काय बोलणार? याची उत्सुकता वाढली होती. अखेर आज पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. आमची जी अपेक्षा होती तसा निर्णय नाही, असे पवार म्हणाले.
- शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे, त्यावर भाष्य करत नाही. निर्णय लोकांनी दिला. त्याचा मी अभ्यास करेन. ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचे मत मी ऐकले. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. यापूर्वी कधी झाले नव्हते असे पैशाचे वाटप झाले असे लोक सांगतात, असे पवार म्हणाले. हा पराभव मान्य असल्याचे त्यांनी सांगितले.



