राजकीय
ब्रेकिंग! सत्तास्थापनेपूर्वीच नवा ट्विस्ट

- राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. आता राज्यात महायुतीचीच सत्ता येणार, हे स्पष्ट झाले. मात्र, मुख्यमंत्री कोण होईल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावर आता छगन भुजबळांनी भाष्य केले आहे.
- भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे का? असे भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही आमचे नेते अजित पवारांची नेतेपदी एकमताने नेमणूक केली आहे. शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आहेत. भाजपच्या नेतेपदी कोण ते कळायचे आहे. आमचा काही फडणवीस यांना विरोध असण्याचे काही कारण नाही. राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले की मग आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असे भुजबळ म्हणाले.
- आम्ही आपआपसात बसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ. तसेच कुणाला कशी मंत्रिपदे वाटायचे तेही ठरेल. कारण आता डिसेंबरचे अधिवेशनही समोर येत आहे. लवकरच निर्णय घ्यावा लागेल, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.



