क्राईम

सरपंचाचे अपहरण अन् हत्या

  • बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. देशमुख खून प्रकरणात पवनचक्की कंपनी व कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मस्साजोग गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी डोणगाव जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून तोडफोड केली. त्यानंतर देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. मात्र, काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली जात आहे.
  • हा खून मस्साजोग येथील पवनचक्कीच्या वादातून आणि खंडणीच्या वादातून झाला आहे. याविषयी मी पोलीस अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना फोन केला. मात्र, ते माझा फोन उचलत नाहीत, असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button