महाराष्ट्र

सतीश वाघ जीवाच्या आकांताने ओरडले ‘वाचवा वाचवा’ पण…

  • विधान परिषदेचे आमदार आणि भाजप नेते योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोलापूर रस्त्यावरील ब्लु बेरी हॉटेलसमोरून आज पहाटे अपहरण करण्यात आले होते. चारचाकीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाघ यांचा शोध घेण्यात येत होता. मात्र आता पोलिसांना वाघ यांचा मृतदेह सापडला आहे.
  • पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात वाघ हे मांजरी परिसरात वास्तव्यास आहेत. आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर असलेल्या सोलापूर रस्त्यावरील ब्ल्यू बेरी हॉटेलपर्यंत ते गेले. यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांचे जबरदस्तीनं चारचाकी गाडीतून अपहरण केले होते. 
  • सीसीटीव्हीमध्ये दिसते की, सतीश वाघ हे ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. यावेळी गाडीतून दोन जण बाहेर आले आणि त्यांनी सतीश वाघ यांना काहीतरी विचारपूस करण्याचं नाटक केलं. त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं. यानंतर आरोपी नेमके कोण होते? त्यांचा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यामागे नेमका उद्देश काय होता? त्यांनी सतीश वाघ यांचं अपहरण नेमकं का केलं? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अशातच आता सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे.

Related Articles

Back to top button