महाराष्ट्र
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय

- पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला. तर लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय, गरम वाटतंय की कसं तुम्हीच बघा, असेही अजितदादा म्हणाले.
- निवडणूक घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. काही तरी स्टंटबाजी करायची. आम्हालाही मारकडवाडी संदर्भात आदर आहे. लक्षात घ्या की, आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला.
- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय गरम वाटतंय की कसं तुम्ही बघा, असं म्हणत अजितदादा यांनी महाविकास आघाडीला डिवचले. 237 महायुतीचे निवडून आले. कधीही ही एवढे निवडून आले नाही. आता तरी डोळे उघडा. लाडक्या बहिणींनी आम्हाला येथे बसवले आहे, असेही अजितदादा म्हणाले.



