क्राईम
घरच्यांना ‘ती’ गोष्ट कळाली अन् तरुणीने केला आयुष्याचा शेवट

- राज्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केली. घरच्यांनी शाळेत घडलेल्या एका घटनेचा जाब विचारल्याने या मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. छत्रपती संभाजीनगरमधील देवळाईतील म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. ही मुलगी एका शाळेत दहावी इयत्तेत शिकत होती. एका दिवशी ती वर्गात शिकत असताना तिला पेन देण्यासाठी एक मुलगा आला होता. या घटनेनंतर काहीच घडले नाही आणि ती घरी गेले होती. मात्र यानंतर या घटनेची माहिती शिक्षकाने जाऊन मुलीच्या कुटुंबियांना दिली होती.
- दरम्यान यानंतर ही तरुणी घरी आल्यानंतर घरच्यांनी संबंधित तरूणाबाबत तिच्याकडे विचारणा केली. याचा मुलीला प्रचंड राग आला आणि याच रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. एका मुलाने फक्त पेन दिल्यावरून घडलेल्या या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.



