क्राईम

भरधाव टँकरने २५ वर्षीय अभिनेत्रीला उडवले

  • राज्यात हिट अँड रन प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. मुंबईच्या वांद्रे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशातच आता मुंबई येथे 25 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. आपल्या मित्रासोबत बाईकवरुन जात असताना डंपरने धकड दिली आणि यावेळी अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला.
  • शिवानी सिंह असे या अभिनेत्रीचे नाव असून ती मालाडमध्ये राहत होती. याबरोबरच ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. दरम्यान, शिवानी तिच्या मित्रासोबत वांद्रे येथील आंबडेकर रोडवरुन आपल्या मित्रासोबत त्याच्या बाईकवरुन जात होती. यावेळेस डंपरने बाईकला मागून धडक दिली आणि शिवानी डंपरच्या चाकाखाली आली. शिवानीचा मित्र काही अंतरावर पडला. पुढे दोघांनाही जखमी अवस्थेत भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात घेऊन गेल्यावर डाॅक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले. दरम्यान, फरार डंपर चालकाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू आहे. तसेच डंपर जप्त करण्यात आला आहे. 

Related Articles

Back to top button