महाराष्ट्र
तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम घोटाळा नसतो का?

- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळूनही आम्हाला कमी जागा मिळाल्या, असा दावा करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? असा सवाल शिंदेंनी विचारला आहे.
- झारखंडमध्ये मतदान झाले, कर्नाटकात झाले. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता प्रियांका गांधी देखील जिंकल्या. म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचे. जेव्हा आपण जिंकतो तेव्हा ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा दुटप्पीपणा आहे, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे. मी आधीच म्हणालो, विरोधी पक्षाला लाडकी बहीण चारीमुंड्या चित करेल. सर्व घटकांनी या राज्यातील विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. जनता घरी बसणाऱ्यांना मतदान करत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
- लोकसभेत दोन लाखांचा फरक असून महाविकास आघाडीला जागा जास्त मिळाल्या. त्यांचे जास्त उमेदवार जिंकून आले. आम्हाला १७ जागा आणि महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. हा ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा का? त्यावेळी त्यांनी काही आक्षेप घेतला नाही, असेही शिंदे म्हणाले.



