महाराष्ट्र
महायुतीची नवी चाल!

विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार असून त्यादरम्यान नवीन सभापतींची निवडही होणार आहे. हंगामी सभापती कालिदास कोळंबकर नवीन आमदारांना शपथ दिली. नूतन सभापतींची निवड उद्या होणार आहे.
दरम्यान विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेतेपदी शिंदे होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीची मोठी बैठक होऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात कॅबिनेट खात्यांबाबत चर्चा होणार आहे. यानंतर अकरा किंवा बारा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.