राजकीय
ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या शरद पवारांवर फडणवीसांचा निशाणा

- राज्यातील निवडणुकीत पक्षांना मिळालेली मते आणि मिळालेल्या जागांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका उपस्थित केली. मोठ्या राज्यात भाजपला सत्ता मिळत आहे. तर लहान राज्यात विरोधकांनी सत्ता दिली जात आहे, अशी टीका पवार यांनी कोल्हापूर येथे केली. या निवडणुकीतील आकडे आश्चर्यकारक आहे. पण ठोस अशी माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी पुष्टीही पवार यांनी केली. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
- शरद पवारसाहेब आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकसभेला भाजपाला 1 कोटी 49 लाख 13 हजार 914 मते मिळाली होती आणि जागा 9 मिळाल्या होत्या. पण काँग्रेसला 96 लाख 41 हजार 856 आणि जागा 13 मिळाल्या. शिवसेनेला 73 लाख 77 हजार 674 मतं आणि 7 जागा मिळाल्या. शिवसेनेला 73 लाख 77 हजार 674 मतं आणि 7 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58 लाख 51 हजार 166 मते मिळाली आणि 8 जागा मिळाल्या. तर 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87 लाख 92 हजार 237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल!
- तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.



