महाराष्ट्र
ईव्हीएम पडताळणीसाठी ‘या’ जिल्ह्यातून एकाही उमेदवाराचा अर्ज नाही

- महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीने अभूतपूर्व यश संपादन करत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. दरम्यान विरोधकांनी परभवाचे खापर ईव्हीएम फोडले आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन तपासणी व पडताळणीचे अर्ज निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ईव्हीएममध्ये नेमका घोळ झाला का, याचे उत्तर पडताळणीनंतर समोर येणार आहे.
- विधानसभा निवडणूक लढलेल्या उमेदवाराने ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी पाच जिल्ह्यातील एकाही उमेदवाराने अर्ज केला नसल्याचे समोर आले आहे. सिंधुदुर्ग, गडचिरोली, वर्धा, नंदुरबार व अमरावती या पाच जिल्ह्यातील एकाही उमेदवाराने ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी अर्ज केलेला नाही. 31 जिल्ह्यांमधील 95 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणी व पडताळणीसाठी एकूण 104 अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आले आहेत. एक लाख 486 मतदान केंद्रांपैकी 755 मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीवॅटची तपासणी करण्याची मागणी समोर आली आहे.



