महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुढील पाच वर्षांचा खुलासा, म्हणाले…

राज्यात आता देवेंद्र पर्वाला सुरूवात झाली आहे. कारण काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद देखील साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी त्यांची पुढील पाच वर्षाची रणनीती नेमकी काय असणार हे स्पष्ट केले आहे. 

गेल्या कार्यकाळात आम्ही शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 षटकांचे सामने खेळलो, तर अजितदादा पवार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही टी-20 खेळलो, मात्र आता आम्हाला कसोटी सामना खेळायचा आहे. म्हणजे पाच वर्षांची दीर्घ खेळी होईल. तसेच ज्यामध्ये आमच्या इच्छेनुसार क्षेत्ररक्षणाची देखील व्यवस्था करू.

विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 आमदार निवडणून आणत फडणवीस यांनी भाजपला राज्यात सगळ्यात मोठा पक्ष बनवले आहे. मात्र, आता त्यांची नवी इनिंग सुरु झाली आहे. तसेच आता शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूर अधिवेशनाच्या आधी होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button