महाराष्ट्र
ब्रेकिंग! पुन्हा राजकीय भूकंप?

- नुकताच महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या आमदारांचे आमच्यासोबत बोलणे झाले आहे, असे देसाई म्हणाले.
- देसाई यांनी नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांबद्दलही भाष्य केले. ठाकरे गटाच्या आमदारांचे आमच्यासोबत बोलणे झाले आहे. त्यांच्या चर्चेतून तिथे खदखद असल्याचे लक्षात येत आहे. ही खदखद राऊत यांच्यामुळे आहे. राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे, असे विधान देसाई यांनी केले.



