ब्रेकिंग! अंतरवालीतून मराठ्याचं वादळ मुंबईच्या दिशेने

देशभरात आज गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. वर्षभरापासून गणेशभक्त याची वाट पाहत असतात. अखेर तो दिवस आला आहे. आज सकाळी घरोघरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. बाप्पा घरी येणार म्हणून घरीत मोदकांचा नैवेद्य तयार करण्यात येत आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे.
जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले. आम्ही हक्क मागण्यासाठी मुंबईत जात आहोत, कोणताही धिंगाणा, दंगल करायला जात नाही. अशी लढाई जगाच्या पाठीवर झाली कधी नसेल. आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे. कितीही दिवस लागले तरी संघर्ष चालू ठेवायचा. आता थांबायचं नाही. शांततेत मुंबईकडे निघायचे. समाजाची मान खाली होईल असे एकानेही वागायचे नाही. आता आरपारची शेवटची लढाई लढायची अन् ही लढाई जिंकायची आहे, असे जरांगे म्हणाले



