महाराष्ट्र

लाडकी बहीण योजना सुरू राहणार, पण…

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडेल, असा दावा विरोधकांकडून वारंवार करण्यात आला. यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणींबाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेईल? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर आज राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 
  • एवढेच नव्हेतर, लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी म्हटले.
  • सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीस यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. लाडक्या बहिणींबाबत प्रश्न विचारले असता फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने जनतेला दिलेली सर्व आश्वासन पूर्ण केली जातील. मात्र, त्यासाठी जी व्यवस्था करावी लागते, ते आधी करू. निकषाच्या बाहेर कोणी असेल किंवा तशा तक्रारी आल्या तर पुनर्विचार केला जाईल.

Related Articles

Back to top button