महाराष्ट्र

ब्रेकिंग! आज महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला पण नाना पटोलेंना पराभव सहन होईना

  • अखेर 13 दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. मुंबईतील आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे, हे गुजरातधार्जिणे सरकार आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
  • पटोलेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये.

Related Articles

Back to top button