महाराष्ट्र
ब्रेकिंग! शिंदेंचे माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार
- महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव अखेर निश्चित झाले. महायुतीच्या नेत्यांनी आज सत्तास्थापनेसाठी राज्यपालांना समर्थनाचे पत्र देऊन विनंत केली. त्यानंतर उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेल्या महायुतीच्या नेत्यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी संबोधन केले. तर उद्या कोण कोण उपमुख्यमंत्री होणार, या प्रश्नावरुन पत्रकार परिषदेत चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.
- पत्रकारांनी विचारले की, उद्या फडणवीस यांच्याबरोबर आणखी कोण कोण शपथ घेणार आहे. यावर शिंदे म्हणाले की, संध्याकाळी आम्ही त्यावर निश्चित सांगू. मी मंत्रीमंडळात असावे की नाही, त्याचा निर्णय मी संध्याकाळी सांगतो. फडणवीस यांनी मला विनंती केलेली आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असे म्हणत असताना अजितदादा म्हणाले की, मला यांचे काही माहिती नाही, पण मी मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, असे म्हणून चांगलाच हशा पिकला. त्यावर शिंदे म्हणाले की, अजितदादांना सकाळी आणि संध्याकाळी शपथविधी घेण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले. शिंदे यांनी दिलेल्या टोल्यानंतर पुन्हा एकदा हशा पिकला अन् सर्वच नेते हसू लागले.