महाराष्ट्र
ब्रेकिंग! फडणवीसांना शुभेच्छा देणार पण…

- भाजपकडून आज देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आज महायुतीकडून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.
- दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर होताच मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर आपण त्यांना शुभेच्छा देऊ, असे म्हटले आहे. जरांगे आज जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
- जरांगे म्हणाले की, सत्तेत कुणीही बसू दे मी आरक्षणासाठी भांडणार. यावेळी सरकारने मराठ्यांशी बेईमानी करायची नाही आणि आमच्या नादाला लागायचे नाही. तुम्हाला आरक्षण द्यावा लागणार आहे. आम्ही लई बहुमताने आलो, आमची सत्ता आली याच्या नादात पडायचे नाही. मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कुणी येवू शकत नाही.



