महाराष्ट्र

ब्रेकिंग! शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार की नाही? सस्पेन्स कायम

  • महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण 237 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले.
  • यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, विनय कोरे, प्रसाद लाड उपस्थित होते.
  • या घडामोडींनंतर फडणवीस, अजितदादा आणि शिंदे या तीनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने शिंदे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी राहणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
  • शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावे, अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे, असे मोठे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. तिघांची शपथ होईल. आणखी कोणाचा होणार हे आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. कोण कोण शपथ घेणार याची माहिती संध्याकाळी देईल. गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतले आहेत. पद ही तांत्रिक गोष्ट आहे. पण आम्ही यापुढेही तिघे मिळूनच निर्णय घेणार आहोत. राज्याला विकासाच्या मार्गावर नेणावर आहोत. जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यावर आमचा भर असेल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button