देश - विदेश

महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधले

  • उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळ्याला आजपासून प्रारंभ झाला. या महाकुंभमेळ्यात देशभरातील आखाड्यातील अघोरी नागासाधू, साध्वी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. महाकुंभमेळ्याला सुरुवात होण्याआधीच देशभरातून नागासाधूंनी प्रयागराजमध्ये मोठी गर्दी केली होती. अखेर आजपासून या महाकुंभमेळ्याला सुरुवात झालीयं. या महाकुंभमेळ्यामध्ये एका साध्वीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे. रथामध्ये बसून ही साध्वीमाता कुंभमेळ्यात दाखल झाली असून याआधी ही साध्वीमाता एक अभिनेत्री होती. मागील दोन वर्षांपासून ती आचार्य महामण्डलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी जी महाराजांची शिष्य आहे. या साध्वीने माध्यमांशी संवाद साधला असून हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.
  • साध्वीची सुंदरता पाहून त्यांना सवाल करण्यात आला. तुम्ही इतके सुंदर आहात, मग साध्वी का बनलात? असा थेट सवाल करण्यात येत आहे. त्यावर साध्वीने दिलेले उत्तर ऐकून नेटकऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
  • मी उत्तराखंडमधून आले आहे आणि मी आचार्य महामंडलेश्वरांची शिष्या आहे. मला आजवर जे करायचे होते ते मी केले आहे. त्यानंतर सर्वकाही सोडून मी साध्वी बनली आहे. साध्वी बनून मला माझ्या आयुष्यात एक वेगळीच शांती अनुभवता येतेय. मी 30 वर्षांची असून गेल्या दोन वर्षांपासून साध्वीच्या रुपात आयुष्य जगतेय, असे साध्वीने सांगितले आहे. हर्षा रिछारिया असे या साध्वीचे नाव असून त्या निरंजनी आखाड्याच्या शिष्य आहेत. त्या स्वत:ला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवतात.

Related Articles

Back to top button